फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा

ajit pawar

अखिलेश कुलकर्णी – कोरोना व्हायरस मुळे राज्यापाठोपाठ संपुर्ण देशात पंतप्रधानांनी लॉक-डाऊन केले आहे. संपुर्ण जनतेला घरी सुरक्षित थांबण्याचे आवाहन करून सुद्धा विनाकारण बाहेर पडणार्यांचा प्रत्येक शहरात पोलिसांनी घेतलेली स्पेशल दखल ही फेमस आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुर्ण महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घातली आहे आणि याची काटेकोर पणे अंमल बजावणीसाठी सगळे पेट्रोल-डिझेल पंप बंद करण्यात आले होते.

परंतु, याने शेतकर्यांसमोर खुप मोठी समस्या निर्माण झाली होती. भाजी, दुध, चारा यांच्या दळणवळणासोबतच अवकाळी पावसाच्या चिंतेची भर पडली आहे. काढणी ला आलेले रब्बी पिके, गहू , इत्यादीना फटका बसण्याची चिन्हे होती, त्यामुळेच महापुरानंतरच्या संकटातून उभा राहताना परत तोंडाशी आलेला घास जाणार म्हणून शेतकरी चिंतेत होते.

या प्रश्नासंदर्भात संजय पवार, युवासेना(शिरोड तालुका) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही कॉल वर संपर्क साधून त्यांचे लक्ष वेधून घेतले असता, दादांनी पुणे जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना डिझेल घेण्याची मुभा द्यावी असे स्पष्ट संगीतल्याची ऑडिओ क्लिप सद्या व्हायरल होत आहे. त्यामुळे वाहनांमार्फत, तसेच गहू काढणीच्या मशीनला डिझेल उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना किमान पिकलेल धान्य वाचवण्याची लगबग करण्याची संधी मिळाली आहे.

हेही पहा –