अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात, पाटलांचा पवारांना टोला

चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात काल (ता. २८) कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत.ते स्वतःच सगळ्या घोषणा करतात, अशा शब्दात पाटलांनी ठाकरे आणि पवार या दोघांनाही चिमटा काढला.

तसेच महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे, अशी टीका करत त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला.

तसेच त्यांनी यावेळी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रश्नावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला कुणी अडवलं आहे? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. ‘आम्ही स्वच्छ आहोत. जी काही चौकशी करायची आहे, ती लवकर करा. या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे. त्यामुळे त्यांचे तेच पडतील’ अशी खरमरीत टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.