अजित पवार झाले भगवाधारी, गृहमंत्रीही उपस्थित
राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे या संस्थेने कारागृहातील कैद्यांसाठी आयोजित केलेल्या ‘जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज’ राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी स्पर्धेसाठीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या गाड्यांना दोन्ही मान्यवरांनी भगवा झेंडा दाखवून स्पर्धेसाठी रवाना केले. यावेळी अजित पवारांनी भगवी शाल पांघरली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
महत्त्वाच्या बातम्या –