…म्हणून मुख्यमंत्रिपद गेलं : अजित पवार

“अशोक चव्हाण हे स्वतः भ्रष्टाचारी आहेत, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं”, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिका निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात लढत असल्याने नांदेडमधील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली.

“आम्ही खोलात शिरलो तर तुम्हाला कठीण जाईल.” असा इशाराही अजित पवार यांनी जाहीर सभेत दिला.