सोमवार पासून पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन, अजित पवारांनी दिले आदेश

ajit pawar

पुणे : कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तसंच पूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. “कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता.

‘उत्तर प्रदेश पोलिसांचा मला अभिमान आहे, माझ्या आत्म्याला समाधान मिळालं आहे’

दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालला आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून एक हजाराहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यात बुधवारी 1618 कोरोना रुग्ण वाढले होते तर गुरुवारी ही संख्या वाढून 1803 वर पोहोचली. यामध्ये पुणे शहर 1032, पिंपरी चिंचवड 573, पुणे ग्रामीण 137 अशी रुग्णांची संख्या आहे.

संचारबंदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औरंगाबादेत प्रशासनाची ‘मास्टर प्लॅनिंग’