मोठी बातमी : अजित पवार पक्षात नाराज ? दिल्लीतील बैठकीला दांडी 

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार गैरहजर राहिले आहेत. अजित पवार बैठकीला नसल्याने उपस्थितांमध्ये त्यांच्या गैरहजेरीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

पक्षातील गटबाजीमुळे अजित पवार हे नाराज आहेत असं काहींचं म्हणणं आहे. या नाराजीमुळेच त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवार हे बैठकीतील गैरहजेरीमुळे होणाऱ्या चर्चा लक्षात घेता विदेशात गेले असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.दे शभरातील महत्त्वाचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते या परिषदेला उपस्थित आहेत,मात्र अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेला वाट मोकळी करून देत आहे.

शरद पवारांच्या कृपेने मल्यांना दोन हजार कोटींचे कर्ज?

अजित दादांमधील माणुसकीचे दर्शन, रस्त्यावर पडलेल्या जखमीला दिला मदतीचा हात

दूध का दूध पानी का पानी व्हायलाच हवं, ते संभाषण समाजापुढे आणा – अजित पवार