राज्यातील एक मंत्री कोरेगाव भीमा दंगल तिसऱ्या मजल्यावरुन पाहत होता – अजित पवार

शिरूर: कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या वेळी मंत्रिमंडळातील एक राज्यमंत्री त्याच ठिकाणच्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन शांतपणे हे सगळे पाहत होते. जर धमक होती तर बाहेर येवून लोकांना विश्वासात घेवून जमावाला शांता करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. दंगल कुणामुळे घडली? याचा मास्टमाईंड कोण? हे जनतेला कळायला हवे. सरकार नको तिथे दबावतंत्राचा करत असल्याचा गंभीर आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रे दरम्यान आज पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सभा पार पडली यावेळी अजित पवार बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे काहीच करत नाही. गिरीश बापट तर काहीही बरळतात. शेतकरी उद्ध्वस्त होत चालला असताना सरकार काहीच हालचाल करत नसल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.

राजकीय इच्छाशक्ती नाही त्यामुळे हे निर्णय घेत नाही. केंद्रात आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराचे सरकार आणा. आज साहेबांच्या अवतीभवती राजकारण फिरत आहे. ममता बॅनर्जी आणि देशातील अन्य प्रमुख नेते साहेबांची भेट घेतात. आपण साहेबांची ताकद वाढवायला हवी. सर्वात जास्त खासदार आणि आमदार या भागातून तुम्ही निवडून द्या आणि आपल्या साहेबांची मान उंचवा, असे आवाहन त्यांनी जनसमुदायाला केले.

You might also like
Comments
Loading...