आचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत ?

टीम महाराष्ट्र देशा- परिवर्तन यात्रेमध्ये पोलिसांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणं रेकॉर्ड करायला सांगतात. हे नवीनच आहे. आचारसंहिता नसताना असं केलं जात आहे. पोलिसांचं काम कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या उद्दिष्टांविषयी शंका घेतली.राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा कर्जत येथे दाखल झाली. यावेळी ते बोलत होते.

आज राज्यातच नाहीतर देशात सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपने लोकांना गुजरातचं फेक मॉडेल दाखवलं. तरुणांना रोजगार नाही दीड कोटी लोकांनी २o१८ मध्ये नोकऱ्या गमावल्या. आज महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. सरकारतर्फे काही हालचाली केल्या जात नाही, अशी देखील टीका पवार यांनी केली आहे.

दरम्यान,याच सभेत बोलताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सेना-भाजपवर निशाणा साधला.  आयोध्येत या अगोदर कोणी आरती केली होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी आरती करून नक्की काय साध्य केले ते त्यांनाच माहीत. राम मंदिराच्या नावाने राजकारण करायचे हे या सरकारचे मूळ उद्दिष्ट आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.