दीडपट हमीभाव म्हणजे भाजपचा चुनावी जुमला – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारकडून शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, 15 लाख रुपयांप्रमाणे दीडपट भाव देखील चुनावी जुमला असल्याचं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच अशी घोषणा करणे म्हणजे लवकरच लोकसभेच्या निवडणूका लवकर घेण्याचा डाव दिसत असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे.

अजित दादांमधील माणुसकीचे दर्शन, रस्त्यावर पडलेल्या जखमीला दिला मदतीचा हात

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत, पण लबाड घरचं जेवण जेवल्याशिवाय काही खरंं नाही. गेल्या हंगामात तुरीला 55 रुपये भाव असताना केवळ 35 रुपयांना विकत घेण्यात आली. आता सरकारकडे घेतलेले शेतमाल ठेवण्यासाठी गोडावून देखील नाहीत.

दरम्यान, आज पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधिमंडळ आवारात पाणी साचल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करताना लोकांच्या करातून येणारे लाखो रुपये कामकाज ठप्प झाल्याने वाया जात आहेत. विधीमंडळाचे दिवस वाया जाणं योग्य नसल्याचं पवार यांनी सांगितले.

दानवेंच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची ‘स्वारी’

रायगडावरील सेलिब्रेटींचं फोटोसेशन निंदनीय – संभाजीराजे