मुंबई : मुंबईतील गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अनावरण झालेआहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले आहेत. सर्वपक्षीय एकत्र आले यांचा आनंद झाला असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर इथे सत्ताधारी- विरोधक कोणी नव्हतं सगळे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी एकत्र आले होते अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, या सोहळ्याला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदी बडे नेते उपस्थित होते. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमास अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु झाली आहे.
यावर अजित पवार यांच्या कार्यालयातून अधिक माहिती देण्यात आली असून त्यानुसार अजित पवार यांचे पुण्यात नियोजित कार्यक्रम होते, त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नसल्याची माहिती अजित पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आलीय.
मात्र, महाविकास आघाडीतील बहुतांश महत्त्वाचे नेते आणि मंत्री उपस्थित असताना, अजित पवार हे का उपस्थित राहू शकले नाहीत? त्यांना आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या आधीच निमंत्रण देण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नसते का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा पुतळा पाहताच चंद्रकांत खैरेंचा कंठ आला दाटून !
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण !
- ग्रामीण भागात ‘आप’ची दमदार एन्ट्री
- परभणी : पेडगावातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त, ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
- राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे : चंद्रकांत पाटील