अजित पवारांना क्लीन चिट नाहीच

ajit pawar ncp
सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची नेमकी भूमिका काय ?हे जाणून घेण्याकरिता ईडी ने एसीबी कडून कागदपत्र मागवली होती , या कागदपत्रांबरोबर एसीबी ने पवारांना क्लीन चिट दिली नसल्याचं ठणकावून सांगितलंय. त्यामुळे सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्या पाठीमागे लागलेलं चौकशीचे शुक्लकाष्ठ कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवरांबरोबरच सुनील तटकरे यांनी कसून चौकशी केली होती.
सत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा सिंचन घोटाळा उघड झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला अटक झालेली नाही फक्त काही अधिकाऱ्यांनाच अटक झाली आहे .क्लीन चिट दिली नसल्याने अजित पवार यांच्या आगामी काळात अडचणी वाढणार असून चौकशीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे .