अजित पवारांनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार;कारण जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विनोद तावडेंचे आभार मानले आहेत.कारण धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंच्या विरोधात परळी मतदार संघातून विधान सभेवर निवडून गेल्याने त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती.

या जागेवर महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे संजय दौंड यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भाजपानेही उमेदवार दिला होता.पण अजित पवारांनी आवाहन केले होते की ही निवड बिनविरोध होऊ द्या.पवारांच्या या आवाहनाला भाजपने सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावला होता.

Loading...

त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांचे आभार अजित पवार यांनी मानले आहेत.भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार आणि भाजपा यांचे संबंध खूपच चांगले आहेत.त्यावरून भविष्यात काहीही होऊ शकते असा संकेतही पवारांनी दिला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...