अजित दादाने भाजपसोबत छय्या छय्या केले, तुम्ही फोने बंद करून ठेवले; मनसेचा धनंजय मुंडेंना टोला

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राज ठाकरे यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात झाली आहे. दरम्यान सभेपूर्वी मनसे नेते गजानन काळे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. गजानन काळे म्हणाले, अजित दादाने भाजपसोबत छय्या छय्या केले, तुम्ही फोने बंद करून ठेवले असा टोमणा यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंना मारला आहे. यासह बीडचा तात्या विंचू म्हणून धनंजय मुंडेंचा उल्लेख देखील केला.

वसंत मोरेंकडून काही मनसे नेत्यांवर नाराजी, म्हणाले…

राज ठाकरेंच्या सभेच्या आदल्या दिवशी वसंत मोरेंनी काही मनसे नेत्यांवर नाराजी व्यक्त करत गौप्यस्फोट केला आहे. वसंत मोरे म्हणाले, “मला सारखं का सांगावं लागतंय की मी मनसेत आहे. कोण यामागे आहे. कुणीतरी या सगळ्या गोष्टी घडवून आणतंय. मला जाणून बुजून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी राज ठाकरेंसमोर या गोष्टी मांडणार आहे. या गोष्टी राज ठाकरेंपर्यंत गेल्याच नसतील. त्यांना इथे काय चाललंय ते माहितीच नसेल. मी याबाबत पुण्यातील पक्षाच्या नेत्यांच्या कानावर गोष्टी घालतोय. गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून मला सांगायला लागतंय की मी मनसेत आहे. कोण पक्षातून कुणाला बाहेर घालवायला बघतंय त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत”.

महत्वाच्या बातम्या –