राज कुंद्राच्या अटकेनंतर अजिंक्य रहाणेचे ‘ते’ ट्विट व्हायरल

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फ्रेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

राज कुंद्राला अटक होताच भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे २०१२ मधील एक ट्विट व्हायरल होत आहे. १९ ऑक्टोबर रोजी केलेल्या या ट्विटमध्ये अजिंक्य रहाणेने राद कुंद्राचे आभार मानले आहे. या ट्विटमध्ये राज कुंद्राला टॅग करत अजिंक्य म्हणतो की,’ राज कुंद्रा सर तुम्ही खुप चांगल काम करत आहात.’ यावर राज कुंद्राने प्रतिक्रिया देताना धन्यवाद तुही नक्की ये आणि लाईव्ह बघ अशी प्रतिक्रिया दिली. राज कुंद्राच्या या उत्तरावर नक्की अशी प्रतिक्रिया अजिंक्यने दिली.

अजिंक्य रहाणे हा २०१२ च्या पर्वापासुन राजस्थान रॉयल्स संघाचा नियमीत सदस्य आहे. गेल्या सत्रात त्याला दिल्ली कॅपीटल्स संघाने विकत घेतले आहे. राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ बनवून वेबसाइटवर अपलोड केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात प्राथमीक तपासणीत राज कुंद्रा यांचे नाव समोर आले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती पुरवे लागल्यानंतर त्यांनी राज कुंद्रा यांना अटक केली. राज कुंद्राच्या अटकेने उद्योगजगत आणि मनोरंजन क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP