‘विराट कोहलीच्या ऐवजी अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनवलं जाईल’

 ‘विराट कोहलीच्या ऐवजी अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनवलं जाईल’

virat kohli

कानपूर : पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरिया (Danish Kaneria)ने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. दानिश कनेरियाने म्हटले आहे की, कसोटी फॉरमॅटमध्येही विराट कोहली (virat kohli) ला कर्णधारपदावरून हटवून त्याच्या दुसऱ्या खेळाडूला संधी द्यायला हवी.

कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. विराट कोहली या सामन्यात खेळत नाही आणि त्यामुळेच रहाणे संघाचे नेतृत्व करत आहे. विराट कोहलीने टी-२० मधील संघाचे कर्णधारपद सोडले असून त्याच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही विराट कोहलीला हटवले जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत.

त्याचवेळी दानिश कनेरियाने आता कोहलीच्या जागी रहाणेला भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते, असे म्हटले आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर तो म्हणाला, ‘विराट कोहली आला तरी त्याला कर्णधारपद दिले जाणार नसून तो केवळ खेळाडू म्हणून खेळणार आहे. मला वाटते की रहाणे कर्णधार म्हणून कायम राहील. मात्र, यासाठी त्याला धावा कराव्या लागतील कारण ते खूप महत्त्वाचे आहे.

अजिंक्य रहाणेसाठी हा कसोटीचा काळ आहे. खराब सुरुवातीनंतर त्याने ऑस्ट्रेलियात संघाचे नेतृत्व केले यात शंका नाही. मात्र, तेव्हापासून त्याचा आलेख खाली घसरला आहे. त्यामुळे रहाणेसाठी न्यूझीलंडची मालिका खूप महत्त्वाची आहे.

महत्त्वाच्या बातम्या