उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या चिमुकलीचं बारसं, नाव ठेवलं…

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. ५ ऑक्टोबर रोजी राधिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर आज अजिंक्यने आपल्या चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून नामकरण समारंभ पार पडल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

काही दिवसांपूर्वी भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विटरद्वारे अजिंक्य बाप झाल्याची माहिती दिली होती. भज्जीनं ट्विट करून अजिंक्य रहाणे बापमाणूस झाल्याची गोड बातमी सर्वांना दिली.या ट्वीटनंतर अजिंक्य आणि त्याच्या पत्नीवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

आर्याचा जन्म झाला त्यावेळी अजिंक्य विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत होता. या सामन्यानंतर अजिंक्य पत्नी आणि मुलीला भेटायला गेला. कन्यारत्नाचा लाभ झाल्यानंतर अजिंक्यने पत्नी राधिका आणि चिमुकलीसोबतचा एक फोटोही शेअर केला होता.

रहाणेच्या छोट्या परीचा काल नामकरण सोहळा पार पडला. मोजक्या निमंत्रित मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.या दोघांनी त्यांच्या कन्येचं नाव आर्या असं ठेवलं आणि याची माहिती राधिकानं इस्टाग्रामवर पोस्ट करून दिली.

महत्वाच्या बातम्या