मलेशियातील राष्ट्रकुल युवा परिषदेत औरंगाबादच्या अजिंक्य कलंत्री यांनी केले भारताचे प्रतिनिधित्व

महाराष्ट्रातील 5 युवकांना राष्ट्रकुल परिषदेत सहभागी होण्याचा मान

औरंगाबाद : मलेशिया येथे झालेल्या जागतिक राष्ट्रकुल युवा परिषदेचा शुभारंभ ब्रिटीश राजघराण्यातील वारस प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते 3 नोव्हेंबरला नॉटिंघॅम विद्यापीठात करण्यात आला.यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान महाराष्ट्रातील पाच युवकांना मिळाला.

शांतता, सामाजिक एकत्रीकरण आणि जागतिक समता अखंड ठेवण्याचा तसेच सातत्यपूर्ण विकासाची प्रतिबद्धता पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे भागीदार होण्याचा संकल्प यावेळी महाराष्ट्रातील तरुणांनी करून भारताला राष्ट्रीय मंचावर उच्चस्थान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला.

या परिषदेत युनायटेड नॅशनल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) द्वारे स्वीकारलेल्या गोल 52 राष्ट्रकुल देशांतील तरुण सहभागी झाले होते. यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 प्रतिनिधींचे शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी झाले होते. औरंगाबाद येथून अजिंक्य कलंत्री, नाशिकमधून विनित मालपुरे, पुणे येथून सौरभ नावांदे , पूजा मानखेडकर , पूर्णिमा पवार या तरुणांची जागतिक परिषदेसाठी निवड झाली होती.

या परिषदेत युवकांनी विविध विषयावर गटचर्चा केली. जगाला शांती, समृद्धी आणि विकसनशीलतेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सहभागी झालेल्या देशांच्या शिष्टमंडळाने कल्पक मते मांडली. भारतीय शिष्टमंडळाने देखील विविध कला ,कल्पनांना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या विचारांच्या संकल्पना मांडल्या. भारत डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल करतोय याची प्रणाली देखील या शिष्टमंडळाने कथित केली. विश्वशांती साठी प्रत्येक राष्ट्राच्या तरुणाई पर्यंत सद्विचार पोहोचवण्याच्या कल्पनेचे या परिषदेत कौतुक करण्यात आले. तीन दिवसांच्या शिखर परिषदेत शिक्षण, हवामान बदल आणि वित्त, डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योजकता, शांतता प्रस्थापित, सामाजिक एकत्रीकरण आणि जागतिक विकास आणि न्यायसंगत समस्यांशी निगडित इतर संबंधित विषयांवर विविध विषयांवर परिसंवाद घडून आला.

मी ज्यावेळी प्रिन्स चार्लेस यांना भेटलो त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली भारतीय संस्कृती आणि जगभरातील इतर संस्कृती यातला फरक मला जाणून घेता आला. त्याचबरोबर मलेशियाचे युथ मिनिस्टर खैरी जमालुद्दीन यांच्याशी चर्चा करताना पाश्चात्य देशातील शिक्षण प्रणाली आणि भारतीय शिक्षण प्रणाली यात मोठी तफावत जाणवली. आपण घेत असलेलं शिक्षण हे १५ वर्ष मागे आहोत त्यामुळे कॉमनवेल्थ मधील सगळ्या देशांची शिक्षणप्रणाली एकसारखी असावी असा निर्णय जगातील सगळ्या राष्ट्रांनी घेतला तर सगळी राष्ट्र एकसंघ बांधली जातील आणि मानवतेच्या हितासाठी नवीन प्रयोग करने सहज शक्य होईल.
अजिंक्य कलंत्री

You might also like
Comments
Loading...