‘चाणक्य’च्या भूमिकेत दिसणार अजय देवगण

टीम महाराष्ट्र देशा : दिग्दर्शक नीरज पांडे ऐतिहासिक कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी चित्रपटात भारतीय इतिहासातील महान विचारवंतांपैकी एक अशा ‘चाणक्य’ यांच्या जीवनावर आधारित  असून ‘आर्य चाणक्य’ यांच्या भूमिकेत अजय देवगण बघायला मिळेल. या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टरटेन्मेंट करणार आहे.

दिग्दर्शक नीरज पांडे यांनी एम. एस. धोनी, अ वेडनस्डे, स्पेशल २६, रुस्तम, या सुपर हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याआधी अजय देवगण यांनी  ‘द लिजंड ऑफ भगत सिंग’  ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारली होती. ट्विटरच्या माध्यमातून अजयने या चित्रपटाबाबत माहिती दिली. महान राजकीय विचारक, तत्वज्ञानी, अर्थतज्ज्ञ अशा चाणक्य यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिकवणीवर हा चित्रपट आधारित असेल, अशी माहिती अजयने दिली आहे.

मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, अजय सोबत अजून कोणते कलाकार या चित्रपटात असणार याबाबत अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

मैत्रीचा हँँगओव्हर चढवणा-या ‘पार्टी’चा पोस्टर लाँँच

मराठी सिनेसृष्टीतील उगवता तारा …नितीन बनसोडे