fbpx

‘आपला माणूस’चं पोस्टर रिलीज

aapla manus nana-patekar-

टीम महाराष्ट्र देशा- ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगणने चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे.हा ‘सैतान बाटलीत मावणार नाय!’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर आहे.चित्रपटातील नानांचा लूक बघून नानांची व्यक्तिरेखा पोलिसांची असावी, असा अंदाज आहे. यात अजय देवगणही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे. तर, इरावती हर्षे, सुमीत राघवन हेही यात प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.अजयनं याआधी ‘सिंघम’ चित्रपटात एका मराठी पोलिसाची भूमिका साकारली होती. मात्र, प्रत्यक्ष मराठी चित्रपटात तो पहिल्यांदाच दिसेल.

2 Comments

Click here to post a comment