‘तो’ पुन्हा येतोय, हसवायला

टीम महाराष्ट्र देशा : तुम्हाला “जो” वाटतोय, “तो” नाही, तर चित्रपट सुष्टीत हसवणारी “ती” जोडी पुन्हा येते. अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांची जोडी पुन्हा गोलमाल चित्रपट घेऊन येते आहे. अर्शद वारसी, तुषार कपूर, अजय देवगन अशी जबरदस्त स्टारकास्ट असलेल्या गोलमाल पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.

लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘गोलमाल’च्या पाचव्या भागाचे चित्रीकरण सुरु करणार आहे. ‘गोलमाल’ मालिकेतील चौथा भाग ‘गोलमाल अगेन’ हा एक हॉरर विनोदीपट होता. ‘गोलमाल-५’ मध्येही प्रेक्षकांना असेच काहीसे कथानक पाहायला मिळणार असे म्हटले जात आहे. सध्या या चित्रपटाची पटकथा व संवादावर काम सुरु आहे. पुढल्या वर्षी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर लगेचच रोहित शेट्टी ‘गोलमाल-५’चे चित्रीकरण सुरु करणार आहे.

अजय देवगण आणि रोहित शेट्टीची जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक-अभिनेत्यांच्या जोड्यांपैकी म्हणून ओळखली जाते. दोघांनी मिळून आतापर्यंत ११ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. रोहितच्या आगामी सूर्यवंशी या चित्रपटामध्ये देखील अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. पुढच्या वर्षी ‘गोलमाल-५’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...