fbpx

अजय देवगण शोक सागरात, वडील विरू देवगण यांचे दु:खद निधन

टीम महारष्ट्र देशा : सुप्रसिद्ध सिनेकलाकार अजय देवगण यांचे वडील अक्शन कोरिओग्राफर वीरू देवगण यांचे आज दु:खद निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी सांताक्रुझच्या सूर्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस त्यांची तब्येत खालावली होती.सांताक्रुझच्या सूर्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.

वीरू देवगण हे प्रसिद्ध स्टंट आणि अक्शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक होते. त्यांनी ८० हून जास्त सिनेमांसाठी अक्शन कोरिओग्राफी केली आहे. ‘हिंदुस्तान की कसम’ नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. फक्त अक्शन आणि दिग्दर्शनच नाही तर वीरू यांनी अभिनेता म्हणूनही अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. ‘क्रांती’ (१९८१), ‘सौरभ’ (१९७९) आणि ‘सिंहासन’ (१९८६) या सिनेमांत त्यांनी अभिनयही केला होता. अक्शन दिग्दर्शक म्हणून त्यांचे ‘फूल और कांटे’, ‘हिम्मतवाला’, ‘प्रेम रोग’, ‘क्रांती’, ‘दो और दो पांच’ हे सिनेमे तुफान गाजले होते.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वीरू यांची तब्येत सातत्याने खालवत होती. यामुळे अजय देवगणने ‘दे दे प्यार दे’ सिनेमाचं प्रमोशन अर्ध्यावर सोडलं होतं. यानंतर त्याने संपूर्ण वेळ वडिलांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला होता.