अजय देवगन आणि काजोल तब्बल 8 वर्षांनंतर दिसणार एकत्र

टीम महाराष्ट्र देशा : अजय देवगन लवकरच बिग बजेट चित्रपट घेऊन येतो आहे. त्याने 2017 मध्ये चित्रपट ‘तानाजी’ ची घोषणा केली होती. सोबत एक पोस्टरदेखील रिलीज केला होता. परंतु, अजय दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी राहिला. 2018 मध्ये ‘रेड,’ ‘टोटल धमाल’ आणि ‘लव्हर रंजन’ या चित्रपटांशिवाय, अजय देवगन ‘तानाजी’ हा चित्रपटात दिसणार आहे.

‘तानाजी’ चित्रपटातून अजय देवगन आणि काजोल तब्बल 8 वर्षांनंतर एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या आधी प्यार किया तो डरना क्या, राजू चाचा, इश्क, यु मी और हम अशा अनेक चित्रपटातून त्यांनी सोबत काम केले असून या जोडीला सोबत बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

चित्रपटात कोण-कोण कलाकार असणार यावर काम सुरू असल्याचे म्ह्टले जात आहे. या चित्रपटाबद्दल अद्याप अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरला सुरू होणार असुन चित्रपटातील इतर स्टार कास्टची नावे लवकरच घोषित करण्या्त येणार आहेत. हा बिग बजेट चित्रपट असून 2019 मध्येय दसरा किंवा दिवाळीत रिलीज होईल, अशी चर्चा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करणार असून ‘तानाजी’ हा चित्रपट मराठा योद्धा ‘तानाजी मालुसरे’ यांचा बायोपिक असणार आहे. ओम राऊत यांना  ‘लोकमान्य : एक युग पुरुष’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण’ हा पुरस्कार मिळाला आहे.

Loading...

‘चाणक्य’च्या भूमिकेत दिसणार अजय देवगण

छोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री

‘शुभ लग्न सावधान’,चाहत्यांनी लग्नपत्रिका पाहिली का ?