मराठीचा मला अभिमान-अजय देवगण; अजय झळकणार मराठी चित्रपटात

'आपला माणूस' अस या मराठी चित्रपटाच नाव असून येत्या ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे

 

मुंबई: अजय देवगण आता मराठी चित्रपटात दिसणार आहे. ‘आपला मानूस’ असं या सिनेमाचं नाव आहे. 9 फेब्रुवारी 2018 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. आपली अनेक दिवसांची इच्छा पूर्ण होत असल्याचं त्याने एका व्हिडिओतून म्हटलं आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांच्यावर आहे.

अजय देवगणने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत ही बातमी चाहत्यांना दिली. ‘महाराष्ट्रासोबत माझं नातं जन्मापासूनचं आहे. मराठी भाषेसाठी मनात पहिल्यापासूनच आदर आहे. पण काजोलशी लग्न झाल्यापासून महाराष्ट्राची भाषा, संस्कृतीच्या आणखी जवळ आलो.

या संस्कृतीवर प्रेम जडलं. या संस्कृतीमुळेच मराठी चित्रपटांची आज एक वेगळी ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग होण्यासाठी ‘आपला माणूस’मधून मी तुमच्यापुढं येत आहे,’ असं अजय देवगणने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे अशी स्टारकास्ट दिसणार आहे.

You might also like
Comments
Loading...