कोकणात लवकरच परबांची जागा अरब घेणार – राज ठाकरे 

राज ठाकरे

रत्नागिरी  – कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाला शिवसेनेसह मनसेचा देखील विरोध आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी  कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाणारवरून सरकारवर निशाणा साधला आहे. सौदीच्या कंपनीची नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात भागीदारी असल्यामुळे, कोकणात परबांच्या ठिकाणी अरब येतील, म्हणजेच परब गेले आणि अरब आले असे चित्र उभे राहील असा चिमटा  राज ठाकरे यांनी यावेळी काढला.

Loading...

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, जमीनदार शेतकऱ्यांना प्रकल्पात भागीदार बनविण्याचा प्रयोग महाराष्ट्रात व्हायला हवा. तसे झाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार नाहीत. सरकारचा कोणताही प्रकल्प व्हायचा असेल तर तो प्रथम धनदांडग्यांना समजतो, ते जमिनी विकत घेतात. तेच नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पात झाले आहे.  म्हणजेच सरकारमधील माणसे पॉलिसी विकतात असाच प्रकार घडत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.Loading…


Loading…

Loading...