ऐश्वर्या आणि आराध्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईः अभिनेता अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्याचे काही नवीन फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोजमध्ये आराध्या आई ऐश्वर्यासोबत दिसतेय. आई आणि मुलीने रेड कलरचा लहेंगा परिधान केला आहे. या फोटोमध्ये आराध्या अतिशय क्यूट पोज देताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या बच्चनच्या चुलत भावाचे लग्न मंगलोर येथे झाले. या लग्नात ऐश्वर्या तिची आई वृदां राय आणि मुलगी आराध्यासोबत सहभागी झाली होती. लग्नात आराध्याने ऐश्वर्यासारखा रेड लहेंगा परिधान केला होता.मामाच्या लग्नात आराध्या एन्जॉय करताना दिसली.मॅचिंग ड्रेसमध्ये आई-मुलीची ही जोडी अतिशय सुंदर दिसली.

You might also like
Comments
Loading...