ऐश्वर्या-आराध्या कोरोनामुक्त; आनंदाश्रू आवरत बिग बी म्हणाले…

Big B

मुंबई : ऐश्वर्या व आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून अभिषेक बच्चनने ट्विटरवर याविषयीची मााहिती दिली होती. त्याचसोबत त्याने ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले होते. आता अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. सोबतच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं म्हटलं आहे.

“आमची चिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. देवा तुझी कृपा आहे”, असं ट्विट बिग बींनी केलं आहे.

अद्यापही बिग बी आणि अभिषेक बच्चनवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आपल्या सोशल मीडिया माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातून एक पोस्ट शेअर केली होती. कोरोना रुग्णांवर कसे उपचार केले जातात, याची माहिती त्यांनी पोस्टमधून दिली होती. ‘कोरोना रुग्णांना रुग्णालयात वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येतं. त्यामुळे तो कित्येक दिवस इतरांना पाहू शकत नाही. डॉक्टर आणि परिचारिका येतात. औषधं देतात. मात्र ते कायम पीपीई किटमध्ये असतात. कोणत्याही रुग्णाला त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा चेहरा पाहता येत नाही,’ अशा शब्दांत अमिताभ यांनी त्यांचा अनुभव शेअर केला होता.

शिवसेना सध्या हवेत आहे, त्यांना वाटतंय आपली स्वर्गाला बोटं टेकली – चंद्रकांत पाटील

मोरारी बापू देणार अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी

…ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी; पाटील, फडणवीसांना आंबेडकरांचा खोचक सल्ला