एअरटेलच्या ग्राहकांना ३० दिवसांसाठी मिळणार ‘ही’ सुविधा

एअरटेल

मुंबई: सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या साठी त्यांच्या कडून ग्राहकांना विशेष ऑफर देण्यात येत आहेत. यामध्ये आता एअरटेल कडून देखील ग्राहकांना अशीच एक ऑफर देण्यात येत आहे.

एअरटेल आणि ऍमेझोन यांच्या भागीदारीतून एअरटेलच्या ग्राहकांसाठी नवीन ऑफरदेण्यात येत आहे. यामध्ये प्रीपेड प्लान्स घेणाऱ्या ग्राहकांना ३० दिवसांसाठी ऍमेझोन प्राइम व्हिडीओ कंटेंट्स फ्री ट्रायल बघायला मिळणार आहे.

89 रुपयांच्या प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशनल प्लान्स लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व बंडल्ड प्रीपेड प्लान्स मध्ये ऍमेझोन प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशनचे 30 दिवसांसाठी फ्री ट्रायल मिळणार आहे. ही मोबाइल एडिशन, सिंगल-यूजर मोबाइल-ओनली प्लान आहे. यामध्ये यूजर्स ऐमेजॉन प्राइम ला SD क्वालिटी मध्ये स्ट्रीम करता येणार आहे.

यामध्ये 28 दिवसांसाठी ऍमेझोन प्राइम व्हिडीओ 6GB डेटा, फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूजिक आणि एयरटेल एक्सट्रीम सब्सक्रिप्शन असून दूसरा प्लान 299 रुपये असून यामध्ये ग्राहकांना रोज 1.5GB डेटा, फ्री कॉलिंग, रोज 100 SMS आणि 28 दिवसांसाठी ऍमेझोन प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशन मिळेल. तर १ वर्षासाठी फ्री ऑनलाइन कोर्स आणि FASTag वर 100 रुपये कैशबैक मिळेल. तर ग्राहकांना ऍमेझोन प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशन कंटिन्यू सुरु ठेवायचे असेल तर 89 रुपये वाला प्लान खरेदी करावा लागेल.

महत्वाच्या बातम्या