भारतात बहुप्रतीक्षित ‘एअरपॉड्स-प्रो’ची विक्री सुरु

blank

टीम महाराष्ट्र देशा : अॅपलने आपल्या बहुप्रतिक्षीत नॉइस कँसलेशन एअरपॉड्स-प्रो ची विक्री बुधवारपासून भारतात सुरू केली आहे. कंपनीने मागच्याच महिन्यात या एअरपॉडच्या अपग्रेड व्हर्जनची लॉन्चिंग केली होती. अमेरीकेत याची विक्री 30 ऑक्टोबरपासून सुरू झाली. नवीन एअरपॉड्स प्रोचे डिझइनही नवीन आहे. तसेच, यात अॅक्टिव्ह नॉइस कँसलेशन फीचरदेखील देण्यात आले आहे. यात डेडिकेटेड ट्रांसपेरंसी मोड फीचरसोबतच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीचे मानने आहे की, अॅक्टिव्ह नॉइस कँसलेशन इनेबल्ड असल्यावर हा फूल चार्जमध्ये चार तासांचा बॅठरी बॅकअप देतो.

एअरपॉड्स प्रोला देशभरातील कोणत्याही अॅपल ऑथोराइज्ड स्टोरमधून खरेदी केले जाऊ शकते. भारतात एअरपॉड्सची किंमत 24900 रुपये आहे. लवकरच याची विक्री अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवर सुरू होईल.

एअरपॉड्स प्रोमध्ये इन-ईयर डिझाइन दिले आहे. हे फ्लेक्सिबल सिलिकॉन ईअर टिप्सला सपोर्ट करते, ज्यात बाहेरचा काहीच आवाज आत जात नाही. यासोबतच यात तीन वेगवेगळ्या साईजचे एअर टीप्सदेखील आहेत. तसेच हे एअरपॉड्स वॉटर आणि स्वेट रेझिस्टंट आहेत.

महत्वाच्या बातम्या