fbpx

Breaking : बारामतीला निघालेलं विमान इंदापूर तालुक्यात कोसळले 

टीम महाराष्ट्र देशा-पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक विमान कोसळले आहे. रूई गावातील श्री बाबीर विद्यालय नजीक मंगळवार दुपारी बारा ते सवा बारा सुमारास ही दुर्घटना घडली आहे. हे शिकाऊ विमान असून ते बारामतीहून निघाले होते असं सांगण्यात आलं आहे.सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या विमानातील शिकाऊ पायलट किरकोळ जखमी झाला आहे.

सिद्धार्थ टायटस असं जखमी पायलटचं नाव आहे.टायटस हे सकाळी १० वाजता अक्कलकोट येथुन विमान घेऊन बारामतीला निघाले होते दुपारी १२ वाजून ५ मिनीटांनी विमान बाबीर विद्यालयाच्या मागील बाजूस ३५००  हजार फुटांवरुन कोसळले चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोकळ्या जागेत पडले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याठिकाणी विमान पडल्याने ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला स्पष्ट झालेले नसून, यासंदर्भात तपास सुरू आहे. मात्र अचानक विमान कोसळल्यामुळे या गावांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.