मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची साद घातली असून केंद्राने देखील मदतीचा हात दिला आहे. विशाखापट्टणम वरून राज्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस येत असून यात देखील बराच वेळ जात असल्याने तातडीची गरज बघता हवाईदलाच्या मदतीने इतर राज्यांतून ऑक्सिजन साठा महाराष्ट्रात पोहोचवावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिलं होतं. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्या राज्यात कोरोना रुग्ण जास्त आहे त्या राज्यांशी चर्चा केली. 9 ते 10 मुख्यमंत्री व महत्वाचे मंत्री या कॉन्फरन्सला उपस्थित होते. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑक्सिजन,रेमडेसीविर आणि लस न्याय हक्काने मिळाली पाहिले. आपल्या संख्येनुसार मिळालं पाहिजे, असे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले. ऑक्सिजन इतर राज्यातून येण्यासाठी उशीर होत आहे. विशाखापट्टणमहून ट्रेन येत आहे पण उशीर झाला आहे. आता ज्या राज्यातून ऑक्सिजन मिळेल तिथे रिकामे टँकर्स एअरलिफ्ट केले जाणार आहेत. एअरफोर्स माध्यमातून रिकामे टँकर्स पाठवले जाणार आहे. यामुळं ऑक्सिजन मिळण्यात गती प्राप्त होईल,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारसाहेब तुम्ही काही करू नका, नाहीतर तुमचे साखर कारखाने हवेतील ऑक्सिजन पण सोडणार नाहीत’
- निलेश लंकेंनी शब्द पाळला; बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी दिला
- राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
- सेवानिवृत्त धारकांचे महिन्याच्या पाच तारखेच्या पेन्शन करा- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले
- रुग्णांना जीवदान देणारी रुग्णालये निष्कळजीपणामुळे मृत्यूचे सापळे ठरू नयेत – रामदास आठवले