fbpx

पुण्याची आस्था आणि जाण असणारा खासदार हवा; वंदना चव्हाण यांचा काकडेंना टोला

vandana-chavan

पुणे: शहराच्या विकासाबदल जाण आणि आस्था असणारा खासदार शहराला हवा आहे, जे सभागृहात उपस्थित राहत नाहीत, एकही प्रश्न विचारत नाहीत असा खासदार काय कामाचा म्हणत राष्ट्रवादी शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी संजय काकडे यांच नाव न घेता टोला लगावला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक आपण पुण्यातून लढणार असल्याचा ठाम विश्वास राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी शुक्रवारी व्यक्त केला होता. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलते होते. संजय काकडे यांनी स्वतःच आपण लोकसभेच्या रिंगणात असल्याचे जाहीर केल्याने आता निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये कलगीतुरा रंगणार हे आहे. याबदल विचारला असता वंदना चव्हाण यांनी देखील काकडेंना टोला लगावला आहे.

संजय काकडे हे सध्या भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य आहेत. मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत काकडे यांनी चमत्कार करत भाजपला सत्तास्थानी आणले. त्यानंतर काकडे यांच्यावर मुख्यमंत्री देखील खुश असल्याचे दिसत आहेत. दरम्यान मध्यंतरी खासदार अनिल शिरोळे आणि काकडे यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे एकेकाळचे पुण्याचे किंगमेकर समजले जाणारे सुरेश कलमाडी यांच्याशी देखील काकडे यांची बैठक झाली होती.

आपण आजवर पक्षासाठी केलेले काम पाहता पक्ष नक्कीच आपला विचार करेल असा विश्वास देखील काकडे बोलून दाखवत आहेत. त्यामुळे आता अनिल शिरोळेना डावलून भाजप संजय काकडेंना उमेदवारी देणार का ? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. याबाबत विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. मी 2019 साठी उत्सुक आहे. पण आपण पक्षाचे सैनिक असून पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याची प्रतिक्रिया शिरोळे यांनी दिली आहे.

1 Comment

Click here to post a comment