तांत्रिक बिघाड झाल्याने एअर इंडियाचे विमान तात्काळ उतरविले

air india

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बोइंग 787 डीमलाइनर हे विमान तात्काळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. पॅरिसला जाणा-या या विमानामध्ये 220 प्रवासी होते. एआय 143 आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक वाजून 58 मिनीटांनी रवाना झालेले विमान तीन वाजून 38 मिनीटांनी परत विमानतळावर माघारी फिरले.

Loading...

त्यानंतर याविमानाऐवजी दुस-या विमानाची व्यवस्था करुन ते पॅरिससाठी रवाना करण्यात आले,अशी माहिती एका प्रवक्त्याने दिलीLoading…


Loading…

Loading...