वैमानिकांचा एअर इंडियाला दणका, थकीत वेतान द्या अन्यथा नोकरी सोडण्याची परवानगी द्या !

टीम महाराष्ट्र देशा : एअर इंडियाचा पाय खोलात असतानाचं एअर इंडियाच्या वैमानिकांनी सेवा नियम आणि थकीत वेतानाची मागणी केली आहे. तर वैमानिकांची संघटना इंडियन कमर्शिअल पायलट असोसिएशननं (आयसीपीए) अनिश्चिततेच्या वातावरणात काम करणं शक्य नसल्याचं सांगत नोकरी सोडण्याचा इशाराही दिला आहे.

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहून इंडियन कमर्शिअल पायलट असोसिएशननं थकीत पगार देण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर थकीत पगार द्यावा किंवा नोटीस पिरिअडशिवाय नोकरी सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

31 मार्चपर्यंत एअर इंडियाची विक्री न झाल्यास कंपनी बंद करावी लागेल हे सरकारचं वक्तव्य योग्य नाही. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात काम करणं शक्य नाही. त्यामुळे सरकारनं आम्हाला कोणत्याही नोटीस पिरिअडशिवाय नोकरी सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली.