fbpx

शिवसेनेच्या मदतीला एमआयएम, अंबादास दानवेंच्या विजयाचा मार्ग सुकर ?

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात शिवसेना विरुद्ध एमआयएमची जोरदार लढत पहायला मिळाली आहे. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यावर मात करत विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे. परंतु आता विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीला एमआयएम धावून आली आहे.

विधानपरिषदेसाठी सोमवारी जालन्यात मतदान झालं आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव कुलकर्णी यांच्यात थेट लढत होत आहे. मतदानावेळी दानवे यांना एमआयएमचे नगरसेवकांनी मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतून होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत ६५६ मतदार आहेत. यामध्ये ३८४ मतदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. सोमवारी १९ ऑगस्टला मतदान झाले असून २२ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या