एमआयएमकडून विधानसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

mim party

टीम महाराष्ट्र देशा :संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची लगबग वाढली आहे.

याच पार्श्वभूमीवर वंचित आघाडीतून बाहेर पडलेल्या एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील जागांचा समावेश आहे. यामध्ये अॅड. शंकर सरगार यांना सांगोला, फारुख मखबुल शाब्दी यांना सोलापूर मध्य, सोफिया तोफिक शेख यांना सोलापूर दक्षिण आणि हिना शफिक मोमीन यांना पुणे कॅंटोनमेंट मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.

ही यादी एमआयएमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केली आहे. यात एकूण चार जागांचा समावेश आहे. एमआयएमने या आधीही ३ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. दरम्यान एमआयएमने वंचित आघाडीच्या सोबत लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली होती त्यामुळे आता विधानसभेला त्यांची कामगिरी कशी असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.