काँग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण देऊ शकते, तर मुस्लिमांना का नाही- ओवेसी

पाटीदार आरक्षणावरुन भाजप-काँग्रेसवर टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण देऊ शकते, तर मुस्लिमांना का नाही, असा थेट सवाल उपस्थित करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देणाऱ्या कॉंग्रेसला चांगलंच धारेवर धरलं आहे. ”काँग्रेसने पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपने पाटीदार समाजाला ओबीसीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेस आणि भाजप दोघांनाही विचारायचंय की, मुस्लिमांची परिस्थिती पाटीदार समाजापेक्षा चांगली आहे का?” असा सवाल ओवेसींनी केला.