एमआयएम-भारिप युती, आगामी निवडणुका सोबत लढणार

टीम महाराष्ट्र देशा- एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ हे राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. प्रकाश आंबेडकर या युतीचं नेतृत्व करणार असून आगामी  महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढविल्या जटील अशी माहिती  एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे .

देशात दंगली घडवण्याचा सरकारचा अजेंडा – प्रकाश आंबेडकर

2 ऑक्टोबरला सकाळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युतीची पहिली बैठक घेतली जाईल. गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबरला औरंगाबादेत युतीची पहिली एकत्र सभा होणार आहे. आगामी अहमदनगर महापालिका निवडणुकीत युतीचा पहिला प्रयोग केला जाणार आहे.

You might also like
Comments
Loading...