मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी नांदेड जिल्ह्यात ७५ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट

Collector, Nanded

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये लसीकरणात वाढ हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी लसीरकणावर जास्तीत जास्त भर दिला आहे. याच दृष्ट्रीकोणातून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील ७५ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा वास्तविक मागास भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भटका समाज राहतो. त्या दृष्ट्रीकोणातून लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान कायम आहे. त्यामुळे ही मोहिम त्यात महत्त्वाचे योगदान देण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या आढळून आली होती. त्यात आता तिसऱ्या लाटेचा धोका पुढील काळात कायम आहे. त्यामुळे जास्तीत लसीरकणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून ही मोहिमी सुरू करण्यात आली आहे. त्याला सकारत्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ही मोहिम यशस्वी झाल्यास हा नांदेड जिल्ह्याचा मोठा विक्रम ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या