सरपंचांनी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करावा – शालिनी विखे

अहमदनगर: सरकारच्या अनेक योजनांचा निधी आता थेट ग्रामपंचायत स्तरावर मिळत असल्याने सरपंचांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळाले आहेत. जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायतींचे महत्त्व वाढल्याने निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सरपंचांनी नियोजन करावे. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी चांगल्या पध्दतीने खर्च करण्याची भूमिका घेवून सरपंचांनी पारदर्शीपणे काम करावे. नगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी, हिवरेबाजार, लोणी बुद्रुक या गावांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे.तसाच लोकसहभाग व सर्व सदस्यांना बरोबर घेवून नूतन सरपंचांनी आपल्या गावांचा कायापालट करावा,असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.नगर जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद सभागृहात जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंचांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा शालिनी विखे बोलत होत्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी माने म्हणाले की,गावाच्या विकासात सरपंच, सदस्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार असतात.त्यांनी सांघिक वृत्ती ठेवून काम केले पाहिजे.अनेकवेळा शासकीय नियमांची माहिती नसल्याने सरपंचांकडून चुकीची कामे होतात व प्रशासनाला कारवाई करावी लागते.हे टाळण्यासाठी सरपंचांनी शासकीय अधिनियम, सरपंचांचे अधिकार, कर्तव्ये याबाबत प्रशिक्षित होणे आवश्यक आहे.

You might also like
Comments
Loading...