निवडणुकांपुर्वी नगर जिल्ह्याचे जिल्हा विभाजन होणार – राम शिंदे

ram shinde

भागवत दाभाडे/ अहमदनगर : निवडणुकांपूर्वी जिल्हा विभाजन होणार असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या जिल्हा विभाजनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.

काल दि.२८ रोजी कोकमठाण येथील महावितरण असोशीयनचे अधिवेशन पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी मंत्री राम शिंदे बोलत होते.

जिल्हा विभाजनाची अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. जिल्हयाच्या विविध खात्याच्या प्रमुखांना व अधिका-यांना एवढया मोठया जिल्हयात जाणं, सेवा देण जिकरीच काम होते. जिल्हा मोठा असल्याने प्रशासकीय पातळीवर अडचण आहे. जनभावनेनुसार जिल्हयाचे विभाजन होऊन दोन जिल्हे झाले पाहिजेत. त्यादृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी याबाबत निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.