शिवसैनिक हत्याकांड: तर हजारो शिवसैनिक करणार वर्षावर ठिय्या आंदोलन

मुंबई: केडगाव येथे घडलेल्या शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर आज नगरमधील शिवसैनिकांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटी दरम्यान ठरल्याप्रमाणे 25 एप्रिलला उद्धव ठाकरे अहमदनगरला भेट देणार आहेत. तसेच हत्या करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत. शिवसेना उपनेते अनिल राठोड, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यावेळी उपस्थित होते

केडगाव येथे शिवसैनिकांचे हत्याकांड घडल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली होती, तसेच यावेळी पोलिसांच्या गाड्यांना देखील लक्ष करण्यात आल होत. याप्रकरणी ६०० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या हत्या झालेल्या शिवसैनिकांचे दहावं झाल्यानंतर शिवसैनिकांना अटक करण्याचे आदेश एसपींनी दिले असल्याची माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, किशोरी पेडणेकर केडगावला जाणार आहेत.

दरम्यान शिवसैनिकांची धरपकड सुरु झाल्यास अहमदनगरचे हजारो शिवसैनिकांनी मुंबईला येवून मुख्यमंत्री बंगला असलेल्या वर्षावर ठिय्या आंदोलन करण्याचे आदेश खुद्द उद्धव ठाकरे यांनीच दिल्याची माहिती मिळत आहे.

You might also like
Comments
Loading...