अहमदनगर पोलिसांना दिवाळी ‘गिफ्ट’

तब्बल पाच हजार बॉक्स खरेदी करण्याचे एसपींचे आदेश

अहमदनगर :- यंदाच्या दिवाळीत पोलिस कर्मचारी ‘आनंदाचे फटाके’ फोडणार आहेत. या दिवाळीत अहमदनगर पोलिस कर्मचाऱ्यांना ‘गिफ्ट’ देण्याची तयारी अहमदनगर पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी चालविली आहे. पोलिस अधीक्षक कार्यलयाकडून पोलिस कर्मचाऱ्याला दिवाळीत भेट मिळणार आहे.

तब्बल पाच हजार फटाके बॉक्स अहमदनगर पोलिस कर्मचाऱ्यांना अल्प दरा मधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसा आदेश पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आला आहे. अहमदनगर घटकाचे आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, कार्यलयीन कर्मचारी यांना दिवाळी सणासाठी फटक्याचे अधिकृत विक्रेते उमासन इंटरप्राइजेज नागपुर यांच्यकडून किफायतशीर दरात पाच हजार फटाके बॉक्स खरेदी करण्यात येणार आहेत.

एक हजार रुपये प्रमाणे एका फटाके बॉक्सची कींमत असेल व ही रक्कम पुढील महिन्याच्या पगारातून वर्ग केली जाईल.प्रत्येक सणा वाराच्या दिवशी घर दार सोडून अविरात्र जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांना आता अनोखी पर्वनी भेट मिळणार आहे.