अहमदनगर पोलीस अधीक्षकांकडून फटाके खरेदी करण्याचा फतवा ; ६० लाखांचे फटाके खरेदी

अहमदनगर : एकीकडे सरकार प्रदूषणमुक्त दिवाळीचा नारा देत आहे तर दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस खातेच या सरकारच्या उपक्रमाला हरताळ फासत आहे. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिवाळीसाठी एक हजाराचे फटाके खरेदी करण्याचा फतवाच काढला.

नागपूरच्या उमसान एन्टरप्राईजेस कंपनीकडून तब्बल पाच हजार फटाका बॉक्स खरेदी करण्यात आले आहेत. या फटक्यांची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल या पाच हजार फटाका बॉक्सची किंमत आहे तब्बल साठ लाख रुपये. आता या फटाक्यांची विक्री जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाण्यातही करण्यात येणार आहे.

या फटाक्यांची विक्री पोलिसांना एक हजार पन्नास रुपये, तर नागरिकांना एक हजार चारशे दहा रुपयाने अशी होणार आहे. पोलिसांच्या पगारातून यांचे पैसे कपात करण्यात येणार असून हा पैसा पोलीस कल्याण निधीसाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आता जे पोलीस फटाके वाजू इच्छित नाहीत वा पर्यावरण पूरक सणाचा संदेश देत आहेत त्यांना सुद्धा पोलीस अधीक्षकांच्या या फतव्यामुळे नाविलाजास्तव हे फटके खरेदी करावे लागणार आहेत.

वाचा अहमदनगर पोलीस अधीक्षकांचा अजब फतवा