अहमदनगर पार्सल स्फोट प्रकरण; पार्सल सरहदच्या संजय नहारांसाठी ?

bombspote

पुणे: अहमदनगर पार्सल स्फोट प्रकरण , पार्सल पुण्याला सरहद संस्थेच्या संजय नहारांसाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नहार यांच्या जीवीताला धोका असल्याची चर्चा होत आहे. नगर पोलीस पथक चौकशीसाठी नहारांकडे रवाना झालं आहे.

नगरमध्ये माळीवाडा भागातील मारुती कुरिअरच्या कार्यालयात झालेल्या स्फोटात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या पार्सलमध्ये स्फोट झाला पार्सल जम्मू कश्मीरमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या पुण्याच्या संजय नहार यांच्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे आता हा स्फोट म्हणजे घातपातच असल्याची शक्यता बळावली आहे. संजय नहार यांची सरहद ही संस्था जम्मू कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करते. दरम्यान संजय नाहर यांची चौकशी करण्यासाठी नगर पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

अहमदनगरमधील माळीवाडा परिसरात एका कुरिअर कंपनीचे कार्यालय असून या कार्यालयात रात्री दहाच्या सुमारास स्फोट झाला. ‘मारुती कुरिअर’असे कंपनीचे नाव आहे. कुरिअर कंपनीचे कर्मचारी एक पार्सल सोडत असताना हा स्फोट झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.