अहमदनगर : शिवद्रोही श्रीपाद छिंदम विजयी !

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. पहिल्या काही फेऱ्यांत पिछाडीवर असलेल्या छिंदमने नंतर आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत राखत त्याने विजय मिळविला. श्रीपाद शंकर छिंदम प्रभाग ९ (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष निवडणूक लढवत होता, त्याने मनसेचे पोपट पाथरे यांचा पराभव केला आहे.

चार फेऱ्यांनंतर मनसेचे पोपट पाथरे यांनी पाचशे मतांची आघाडी घेतली होती मात्र, नंतर सहाव्या फेरीनंतर छिंदमने चारशे मतांची आघाडी घेतली़ त्याची ही आघाडी तेराव्या फेरीनंतर १८५० मतांपर्यंत पोहोचली आहे़ या प्रभागात छिंदमविरोधात अनिता राजेंद्र राठोड (राष्ट्रवादी), सुरेश रतनप्रसाद तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़