अजय-अतुलच्या ठेक्यावर थिरकले नगरकर

अहमदनगर/प्रशांत झावरे : जनसेवा फौंडेशनच्या वतीने आयोजित नगर सांस्कृतिक महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात काल रात्री संपन्न झाला. लेक वाचवा अभियानांतर्गत जिल्ह्यातील १५ महिलांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. प्रसिद्ध संगीतकार, गीतकार अजय-अतुल बरीबरच स्वप्नील बांदोडकर, अभिजित सावंत, बेला शेंडे यांनी गायलेल्या गीतांनी नगरकर मंत्रमुग्ध झाले व गायलेल्या गाण्यावर नगरकरांनी ठेका धरला. नगरमधील भव्य आशा वाडिया पार्क स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सोहळ्यास लाखाहून जास्त नगरकरांनी उपस्थिती लावली. नगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावली होती. जास्त गर्दीने काही वेळेस गोंधळ पण उडाला होता.

जनसेवा फौंडेशनचे डॉ.सुजय विखे यांनी स्वतः गेल्या एक महिन्यापासून या कार्यक्रमाच्या तयारीवर खास लक्ष ठेऊन याची यशस्वी सांगता केली. संपूर्ण जिल्हयात जनसेवा फौंडेशन अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम घेत असून त्यातील सर्वात मोठा सोहळा वाडिया पार्क नगर मध्ये आयोजित केला होता.

Loading...

ज्यांच्या गाण्यांनी सर्वानाच भुरळ पडते असे अजय- अतुल, स्वप्नील बांदोडकर, अभिजित सावंत, बेला शेंडे यांच्याबरोबर सई ताम्हणकर व विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे, कमलाकर सातपुते, पॅडी कांबळे यांसह अनेक दिगग्ज कलाकारांनी आपल्या जादूने नगरकरांना अक्षरशः घायाळ करून टाकले. अजय अतुल या जोडीच्या गाण्यांनी संपूर्ण स्टेडियम नाचायला लागले होते. अजय अतुलच्या झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांबरोबर डॉ.सुजय विखे यांनीही थोडा वेळ डान्स केला. तर मकरंद अनासपुरे व सई ताम्हणकर यांनी केलेल्या विनोदी निवेदनाने प्रेक्षक पोट धरून हसत होते.

तसेच मकरंद अनासपुरे व सई ताम्हणकर यांनी डॉ.सुजय विखे यांची मुलाखत पण घेतली, त्याला डॉ.सुजय यांनी दिलखुलास उत्तरे दिली. या मुलाखतीमधून डॉ.सुजय विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील पाहिले न्यूरो सर्जन असल्याचे नगरकरांना कळले.

त्याबाबत डॉ.सुजय विखे यांनी स्वतःच सांगितले व आपल्याला अतिशय साधेपणाने राहून जनतेची सेवा करावयाची असून त्यांनी आतापर्यंत जनसेवा फौंडेशनने केलेल्या कामाचा आढावा सांगितला. यामध्ये गरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना दत्तक घेतले व त्यांच्या शिक्षणाचा खर्च, नागरिकांचा अपघाती विमा, सर्वच रोगांवरील आरोग्य शिबिरे भरविणे याच बरोबर अनेक उपक्रमांची त्यानी माहिती देऊन उपस्थित प्रेक्षकांनी याचा फायदा घेऊन सर्वाना सांगण्याचे डॉ.सुजय विखे यांनी आवाहन केले.

या कार्यक्रमात लेक वाचवा अभियानांतर्गत १५ महिलांचा सन्मान केला गेला. त्यात साईबाबा संस्थान शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल-गुप्ता, अंजली वल्लकट्टी-देवकर यांसह अनेक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला गेला.

यांचा सन्मान अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई राधाकृष्ण विखे यांनी केला. यावेळी महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार भानुदास मुरकुटे, अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह निरनिराळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, सर्वानी शेवटपर्यंत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत