भाजपला साथ देणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवारांचे समर्थन ?

अहमदनगर : अहमदनगरच्या महापौर निवडीमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिसऱ्या क्रमाकांवरील भाजपला पाठींबा दिला, त्यामुळे पुरेसे संख्याबळ असताना देखील शिवसेना सत्तेपासून दूर राहिली तर भाजपला आपला महापौर निवडून आणता आला. दरम्यान, भाजप – राष्ट्रवादीच्या नगर पॅटर्नमुळे राज्यभरातील सामान्य नागरिकांपासून ते राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश देऊनही आ संग्राम जगताप यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. दरम्यान, आ जगताप यांना राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे समर्थन असल्याचं बोललं जात आहे.

Loading...

अहमदनगर महापौर निवड सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. महापौर निवडीनंतर नगर पॅटर्नच्या बातम्या प्रसिद्ध होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवकांवर कारवाई केली जाणार असल्याचं बोलल जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबंधित नेत्यांना करणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी नगरसेवकांच्या उत्तराची वाट न पाहता कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. मात्र भाजपशी युती करण्यात सिंहाचा वाटा असणारे आ संग्राम जगताप यांच्याबद्दल बोलण्यास पक्षातील एकही नेता तयार नसल्याचं दिसून येत आहे.

दुसरीकडे, शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी आपण भाजपला पाठींबा देणार असल्याची माहिती आ संग्राम जगताप यांनी अजित पवारांना दिली होती, तसेच पवार यांनी त्यास संमती दिल्याची चर्चा नगर राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे. मात्र खुलेआमपणे बोलण्यास कोणीही धजावत नाहीये. एप्रिल महिन्यात नगरमध्ये घडलेल्या शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणात आ संग्राम जगताप यांच्यासह त्यांचे वडील आ अरुण जगताप आणि सासरे आ शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे याचा वचपा काढण्यासाठी संग्राम जगताप यांनी भाजपला पाठींबा देण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. शिवसैनिकांच्या हत्याकांडामध्ये अटक झाल्यानंतरही इतर नेते गप्प असताना अजित पवार यांनी जगताप कुटुंबियांची पाठराखण केली होती. त्यानंतर आता पक्षातील इतर नेत्यांकडून नगरमधील युतीवर भाष्य केले जात असताना अजित पवारांनी मात्र चुप्पी साधली आहे.

दरम्यान , दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ‘माझाच आदेश पाळला जात नसेल तर कारवाई होणार; असे स्पष्ट केले होते. त्यातच आता भाजपला पाठींबा देण्यास अजित पवार यांनी संमती असल्याच्या चर्चा सुरु झाल्याने. पक्षामध्येच सर्वकाही आलबेल असल्याचं उघड झाल आहे.Loading…


Loading…

Loading...