अहमदनगर दुहेरी हत्याकांड प्रकरण; पीडित कुटुंबियांचे अमरण उपोषण

अहमदनगर – केडगावमध्ये काही दिवसांपूर्वी भरदिवसा दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. वसंत ठुबे आणि संजय कोतकर असं या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं नाव होतं. दरम्यान आता ठुबे, आणि कोतकर कुटुंबियांनी पोलीस तपासावर अक्षेप घेतलाय, माहिती देऊनही तपासी अधिकारी योग्य तपास करत नसल्याचा परिवाराचा आक्षेप आहे

bagdure

कर्डीले यांचे मुख्यमंत्र्यांशी लागेबांधे असून, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा दबावात पोलिस हतबल असल्याचा आरोप त्यांनी केलाय ठुबे आणि कोतकर कुटुंबिय अमरण उपोषणाला बसले आहेत, याप्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देन्यात आलय. भाजप आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप आणि भानुदास कोतकर यांनी कटकारस्थान करुन वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांची निर्घघृ हत्या केली. माञ हत्याा प्ररकरणी केवळ संग्राम जगताप यांना अटक झाली असून भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक झाली नाही. मुख्यमंञ्यांचं पाठबळ असल्यानं अटक होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.

त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा दबाव असल्यानं अरुण जगताप यांना अद्याप अटक नाही. फरार आरोपी भानुदास कोतकर पुणे शिरुर आणि मुंबई पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यावर देखिल त्यांना अटक करण्यात आली नाही. त्याचबरोबर शिवाजी कर्डिले यांचं निवासस्थान. आमदार अरुण जगताप यांचं कार्यालय आणि हॉटेल त्याचबरोबर भानुदास कोतकर यांच्या निवासस्थानाचं सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर आणि हार्डडिस्क गायब करुन पुरावा नष्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित कुटूंबिय अमरण उपोषणाला बसले आहेत.

You might also like
Comments
Loading...