fbpx

अहमदनगर जिल्हा विभाजन होणारच – राम शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : जिल्हा विभाजन व्हावे, ही तमाम जनतेची इच्छा आहे. जनतेची इच्छा हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे हा प्रश्न सातत्याने मांडत आलो आहे. जिल्हा विभाजन होणारच, यात शंकाच नाही, अशी ग्वाही पालकमंत्री शिंदे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. यंदाच्या बजेटमध्ये भरीव तरतूद केली होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदींची उपस्थित होते.