धुळे-नगर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

टीम महाराष्ट्र देशा – महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३३९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले़ भवानीनगर येथे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे.महापालिकेच्या ६८ जागांसाठी मतदान घेण्यात आले़. दुपारी एक वाजेपर्यत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

धुळ्यात ७४ (१ बिनविरोध) जागांसाठी तर ६८ जागांसाठी मतदान झाले होते. त्याचा आज निकाल लागणार आहे. धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 73 जागांसाठी हे मतदान झाले. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण 74 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव होत्या.

You might also like
Comments
Loading...